ठाणे शहरातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १४ केंद्रावर लसीकरण सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत सुरू राहणार आहे, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे.

ठाण्यात १५-१८ वयोगटासाठी लसीकरण कुठे-कुठे उपलब्ध?

१. जोशी- बेडेकर महाविद्यालय (ठाणे कॉलेज) क्रिक रोड (ठाणे पश्चिम)
२. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, परबवाडी (ठाणे)
३. आनंदनगर लसीकरण केंद्र –चेकनाका (ठाणे पूर्व)
४. आर.जे. ठाकूर महाविद्यालय-लोकमान्यनगर (ठाणे)
५. ब्राह्मण विद्यालय, वर्तकनगर (ठाणे)
६. सेंट झेवियर्स शाळा, मानपाडा (ठाणे)
७. सरस्वती शाळा, आनंदनगर, कासारवडवली (ठाणे)
८. ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल, घंटाळी मंदिरामागे, घंटाळी (ठाणे)
९. महिला लसीकरण केंद्र, टेंभीनाका (ठाणे)
१०. प. सहकार विद्या प्रसारक मंडळ (सह्याद्री शाळा), मुंबई पुणे रोड (कळवा)
११. काळसेकर महाविद्यालय (मुंब्रा)
१२. एस.एन.जी. शाळा (दिवा)
१३. जी.आर. पाटील महाविद्यालय (मुंब्रा)
१४. पार्किंग प्लाझा, (ऑनलाईन) ज्युपिटर रुग्णालयाशेजारी (ठाणे)

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

ठाण्यातील वरील लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार आहे. ठाण्यातील पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

किशोरवयीन मुलांसाठी कोवॅक्सिन लसीचा एकमेव पर्याय उपलब्ध

१५ ते १८ वर्षांची मुले लसीकरणासाठी आपल्या आयडी कार्डवरून कोविन अॅपवर नोंदणी करू शकतात. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व किशोरवयीन मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. ते ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात.

हेही वाचा : मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून; पंतप्रधानांची घोषणा; आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लस

३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणामध्ये (१५ ते १८ वर्षे) किशोरवयीन मुलांसाठी कोवॅक्सिन लसीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी आपल्या १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.