ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महानगर पट्ट्यातील पायाभूत सुविधांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांना वेग मिळावा यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर वेगाने हालचाली होत असल्याचे चित्र सातत्याने उभे केले जात असताना दुसरीकडे याच भागातील लाखो प्रवाशांच्या दळवळणासाठी निर्णायक ठरू शकतील, असे रेल्वे प्रकल्प मात्र भूसंपादन, आर्थिक नियोजन तसेच तांत्रिक अडचणीमुळे रखडल्याचे चित्र कायम असल्याचे पहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पनवेल – कर्जत, ऐरोली-कळवा नवीन काॅरिडाॅर, कल्याण – आसनगाव (चौथी मार्गिका), कल्याण – कसारा तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका यासारख्या मोठ्या प्रकल्पांचा कोविड काळापासून रखडलेला गाडा फारसा पुढेच सरकत नसल्याने ठरविलेल्या मुदतीत हे प्रकल्प पूर्ण होतील का हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.
गेल्या काही वर्षांपासून महानगर पट्ट्यातील शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत असून येथील नोकरदार वर्गाचा भार उपनगरीय रेल्वेगाड्यांवर अधिक असतो. यामुळे रेल्वे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मध्य आणि पश्चिम मार्गावर मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी) टप्पा ‘तीन’ आणि टप्पा ‘तीन अ’ मध्ये विविध प्रकल्प साकारले जात आहेत. त्यापैकी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत पनवेल-कर्जत नवी उन्नत मार्गिका, ऐरोली कळवा उन्नत मार्गिका, कल्याण-बलापूर तिसरी- चौथी मार्गिका तर मध्य रेल्वे मार्फत कल्याण- कसारा तिसरी मार्गिका, कल्याण आसनगाव चौथी मार्गिका हे प्रकल्प उभारले जात आहेत. पनवेल कर्जत नवी उन्नत मार्गिकेसाठी अंदाजित २ हजार ७८२ कोटी रुपये, ऐरोली – कळवा उन्नत मार्गिकेसाठी अंदाजित ४७६ कोटी, कल्याण-बदलापूर तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेसाठी १ हजार ५०९ कोटी, कल्याण आसनगाव १ हजार ७५९ कोटी आणि कल्याण-कसारा मार्गिकेवर ७९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यातील काही प्रकल्प डिसेंबर २०२५ आणि मार्च २०२६ मध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे. असे असले तरी यापैकी सर्वच प्रकल्पांचे काम रडतखडत सुरू असल्याने दिलेल्या मुदतीत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान आता संबंधित विभागांपुढे आहे.
हेही वाचा – कल्याणमधील इतिहासाचे अभ्यासक श्रीराम साठे यांचे निधन
प्रकल्पांची स्थिती
- ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका
- या प्रकल्पास डिसेंबर २०१६ मंजूरी मिळाली तर २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. दोन टप्प्यांमध्ये या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांमध्ये दिघा रेल्वे स्थानक उभारणीचा होता. हे स्थानक उभे राहीले आहे मात्र उद्घाटनाची अजूनही प्रतिक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका तयार केली जाणार आहे. या कामासाठी २.६५ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यापैकी ०.५७ हेक्टर जमीन खासगी मालकीची तर, २.०८ हेक्टर जमीन सरकारी मालकीची आहे. सरकारी मालकीच्या १.८७ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. या जमिनीवर मोठे अतिक्रमण असून येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याने हा प्रकल्प अडकून पडला आहे.
- पनवेल-कर्जत नवी उन्नत मार्गिका
- या प्रकल्पास जानेवारी २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती. यातील ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे. प्रकल्पास लागणाऱ्या ५६.८७ हेक्टर जमिनीपैकी ५६.८२ हेक्टर खासगी जागेचे तर ४.४ हेक्टर सरकारी जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. येथे मुंबई भागातील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामात फारसे अडथळे नसले तरीही कामाचा वेग फारसा समाधानकारक नसल्याच्या तक्रारी आहेत.
- कल्याण- बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका
- कल्याण ते बदलापूर अशा १४ किलोमीटरच्या दोन मार्गिका असतील. यासाठी सुमारे १ हजार ५०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे जेमतेम १० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण १३.६१ हेक्टर जागा लागणार असून त्यापैकी १०.४५ हेक्टर जागा खासगी आहे. मुंबईतून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण भारताला जोडण्यासाठी कल्याण – कर्जत रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. यातील कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत ही महत्त्वाची आणि वर्दळीची स्थानके आहेत. मात्र जमीन संपादनाचा तिढा अजूनही नसल्याने मार्च २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल का याविषयी संभ्रम आहे.
- कल्याण- कसारा तिसरी मार्गिका
- या मार्गिकेसाठी एकूण ७९२.८९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ६७.३५ किलोमीटर लांब तिसरी मार्गिका आहे. या प्रकल्पासाठी ४९.२३ हेक्टर जागेचे भूसंपादन करायचे आहे. त्यापैकी ३५.९६ हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून भूसंपादनाच्या पलिकडे या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेले नाही.
- कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका
- या प्रकल्पाच्या मार्गिकेची लांबी ३२.२२ किमी आहे. यासाठी १ हजार ७५९.१६ कोटी इतका खर्च येणार आहे. हा प्रकल्प अद्याप प्राथमिक टप्प्यात असून मार्च २०२६ पूर्वी प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे.
दिघा रेल्वे स्थानक पूर्ण होऊनही अद्याप ते प्रवाशांसाठी अजूनही सुरु करण्यात आलेले नाही. याशिवाय यापैकी काही प्रकल्पांमध्ये भूसंपादनाचे मुद्दे आहेत. गेल्या काही काळापासून या आघाडीवरदेखील सरकारचे धोरण धीमे दिसत आहे. अशाने हे प्रकल्प विहीत वेळेत पूर्ण कसे होणार हा प्रश्न अनुत्तीरत आहे. – राजन विचारे, खासदार ठाणे
हेही वाचा – कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड
कल्याण कसारा मार्गिकेच्या भूसंपादनाचे काम ७३ टक्के पूर्ण झाले असून कल्याण आसनगाव प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर असून हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी काम सुरू आहे. – डाॅ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे