ठाणे : पाच वर्षांपुर्वी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असतानाही त्याचा अपमान करत महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले आणि अडिच वर्षात हे सरकार पडले. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला, मेट्रोसह अनेक प्रकल्प थांबले, त्याचे दुष्परिणाम राज्याला आजही भोगावे लागत आहेत, अशी टिका केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. लाडकी बहिण योजनेद्वारे आम्ही महिलांना लाच देतो, असे विधान काँग्रेसचे नेते एकप्रकारे मातृशक्तीचा अपमान करित असल्याची टिकाही त्यांनी केली.

ठाणे येथील कापुरबावडी भागातील भाजपच्या मिडीय सेंटरमध्ये शनिवारी दुपारी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टिका केली. यंदाच्या निवडणुकीत राज्याच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे पाच वर्षांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काय घडले, याचे जनतेने स्मरण करायला हवे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजून जनादेश दिला. असे असतानाही जनतेच्या जनादेशाचा अपमान करत महाविकास आघाडीने राज्यात स्थापन केली. अडीच वर्षातच हे सरकार पडले. या काळात महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. या सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार वाढला. मेट्रो तसेच इतर प्रकल्पांची कामे थांबविण्याचे काम मविआ सरकारने केले. एकूणच मविआ सरकारच्या कामामुळे राज्याला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, अशी टिका मंत्री शेखावत यांनी केली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हेही वाचा…डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक सुरू असून याच काळात काँग्रेसने देशभरात नवी पद्धत पुढे आणली आहे. लोकांना भुलवणारे आणि आधारहीन घोषणा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसला माहित आहे की आपण सत्तेवर येणार नाही. परंतु अशा घोषणामुळे अशांतता निर्माण होईल, या उद्देशातून काँग्रेस अशा खोटी आश्वासने आणि घोषणा करीत आहे, अशी टिका त्यांनी केली. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात काँग्रेसने शेतकरी कर्ज माफी, युवा आणि महिलांसाठी योजना, सुरक्षा अशा घोषणा करून काँग्रेसने सत्ता मिळवली होती. परंतु या घोषणाची काँग्रेसने अमलबजावणीच केली नाही. यामुळे या राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. आमच्या सरकाने ज्या योजना राबविल्या. त्यांना नवीन मुलामा देऊन त्या राबविणार असल्याची घोषणा करत काँग्रेस आमच्या योजनांची नक्कल करत आहे, असा दावाही त्यांनी केला.

Story img Loader