उल्हासनगर : पाण्याचा फुगा मारल्याच्या रागात एका दुकानात घुसून ७ ते ८ जणांच्या टोळीने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाचच्या दुकानात हा प्रकार झाला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगरमध्ये अंगावर फुगा मारल्याच्या रागातून तुफान राडा झाला. यात ७ ते ८ जणांच्या टोळीने थेट दुकानात घुसून दोन जणांना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यात इर्शाद अली आणि अब्दुल हकीम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुले फुगे मारत होते.

या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला. त्यानंतर या टोळक्याने थेट दुकानात घुसून इर्षाद आणि अब्दुल हकीमवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी सध्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र होळीपूर्वीच झालेल्या या प्रकारामुळे अशा फुगे मारणाऱ्यांवर कारवाईची मागणी होते आहे.