ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दीड वर्षांत सुमारे ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये गांजा, चरस आणि एमडी हे अमली पदार्थ सर्वाधिक जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणांत सेवन आणि विक्री करणाऱ्या सुमारे चार हजार जणांविरोधात गुन्हे दाखल आणि अटकेची कारवाई झाली आहे. अमली पदार्थामध्ये सर्वाधिक मागणी गांजाची आहे. गांजा हा इतर अमली पदार्थांच्या तुलनेत सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. त्यामुळे त्याची मागणी अधिक असल्याचे सुत्रांनी सांगितले.

पुण्यातील काही तरुणांमध्ये अमली पदार्थांचा विळखा बसला असून त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होऊ लागले आहेत. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये असा प्रकार घडत असताना मुंबई लगतच्या ठाणे शहरातही तरुण नशेच्या आहारी गेल्याचे समोर येत आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्र येतो. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. यामध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ४ कोटी ४५ लाख ९७ हजार ३१९ रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला. तर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या १ हजार २५२ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी १ हजार ७७ जणांवर अमली पदार्थ्याचे सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या वर्षी १ जानेवारी ते २३ जून या कालावधीत ५५ कोटी ७६ लाख १० हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तर २ हजार ७२४ जणांविरोधात कारवाई झाली असून त्यापैकी २ हजार ६१२ जणांना सेवन प्रकरणी ताब्यात घेतले. तर उर्वरित आरोपींना विक्री आणि निर्मिती करताना अटक केली आहे. विक्री आणि सेवन करणाऱ्या आरोपींमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे.

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune md drugs marathi news
पुणे : गुन्हे शाखेकडून २५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; मेफेड्रोन, गांजा विक्री प्रकरणात तिघे अटकेत
Kalyan Dombivli police drug smuggling case arrest
कल्याण-डोंबिवलीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना अटक
cyber crime rising and engineers students and educated citizens becoming victim
सायबर गुन्हेगारांच्या ‘जाळ्यात’ उच्च शिक्षितच; गेल्या वर्षभरात किती तक्रारी?
punjab police drugs fact check Video
पंजाब पोलिसांकडून खुलेआमपणे ड्रग्जचे सेवन? पत्रकाराने रंगेहाथ पकडले; Viral Video मागचं नेमकं सत्य काय? वाचा
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
One person arrested with ganja stockpile in Kopar Dombivli
डोंबिवलीत कोपरमध्ये गांजाच्या साठ्यासह एक जण अटकेत

हेही वाचा – अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाण्याबाबत अतिरिक्त काळजी घ्या, जीवन प्राधिकरणाचे नागरिकांना आवाहन; तक्रारीसाठी क्रमांक जाहीर

पोलिसांच्या कारवाईमध्ये सर्वाधिक गांजा, चरस आणि एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी यावर्षी २२० किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मागील वर्षभरात ७८२ किलो ८११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजा हा अमली पदार्थ इतर अमली पदार्थ्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. तसेच हा अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असतो. सहज विकत घेता येत असल्याने हा अमली पदार्थ नशेबाज तरुण सर्वाधिक विकत घेत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

१ जानेवारी ते २३ जून या कालावधीतील कारवाया

अमली पदार्थ – वजन – आरोपी – किंमत

१) गांजा – २२० किलो १५० ग्रॅम- ५२- ५ लाख

२) चरस- १० किलो ४०० ग्रॅम – ६- १ लाख १० हजार

३) एमडी – ७ किलो २२४ ग्रॅम- ४४- ७ कोटी ८६ लाख २० हजार

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३

अमली पदार्थ- वजन – आरोपी- किंमत

१) गांजा – ७८२ किलो ८११ ग्रॅम- ६५- १ कोटी ३० लाख ५ हजार १०८

२) चरस- ७ किलो ७८३ ग्रॅम- १८- ८७ लाख ६४ हजार

३) एमडी – २ किलो ५९२ ग्रॅम – ६१- १ कोटी २० लाख ९७ हजार २५०

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अमली पदार्थाविरोधी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ आणि त्याचे दुष्परिणाम या कार्यक्रमाविषयी परिसंवाद घेतले जात आहे. – शिवराज पाटील, उपायुक्त, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा.

हेही वाचा – डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा; ह प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी

मोक्का अंतर्गत कारवाई

मागीलवर्षी ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आठ जणांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून ३१४ ग्रॅम एमडी आणि ४ किलो ८५० ग्रॅम चरस जप्त केला होता. या कारवाईनंतर पोलिसांनी आठही आरोपींची चौकशी केली. त्यांनी अमली पदार्थांची तस्करी यापूर्वी अनेकदा केल्याचे आढळून आले. ही संघटित गुन्हेगारी असल्याने पोलिसांनी आठही जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.

Story img Loader