भिवंडी येथील शांतीनगर भागातून गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. कुमार मिस्त्री (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मोबाईल चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले; ठाणे रेल्वे स्थानकातील प्रकार

शांतीनगर येथील जब्बार कंपाऊंड परिसरात मंगळवारी अंमली पदार्थ विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे ५ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत बाजारात एक लाख दोन हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.