लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षापासून भाजपचे आमदार गणपत गायकवाड नेतृत्व करत आहेत. आपला माणूस म्हणून त्यांची या मतदारसंघात ओळख आहे. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अनेक इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवली असली तरी कल्याण पूर्वेवर भाजपचाच दावा असेल आणि गणपत गायकवाड हेच येथे उमेदवार असतील, असे स्पष्ट करून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मतदारसंघातील विविध दावे, प्रतिदाव्यांवर पहिल्या टप्प्यात तरी पडदा टाकला आहे.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

भाजप शिखर समिती आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी कल्याण पूर्वेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत रविवारी आमदार गायकवाड समर्थकांनी ‘व्हा तयार, करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार’ अशा आशयाचे फलक लावून आमदार गायकवाड हेच कल्याण पूर्वचे उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत. या बॅनरवर भाजपच्या केंद्रीय, राज्य नेत्यांसह माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रतीमा आहेत.

आणखी वाचा-कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला एकटे सोडून मित्र पळाला

कल्याण पूर्व मतदारसंघात विधानसभेसाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. अनेक इच्छुक या मतदारसंघात उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी या मतदारसंघावर शिवसेना दावा करत असली तरी भाजप हा मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. अनेक वर्ष गणपत गायकवाड हेच कल्याण पूर्व मतदारसंघात निवडून येतात. जनतेला ते आपलाच माणूस वाटतात. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच या मतदारसंघाचे पुन्हा नेतृत्व करतील याविषयी जनता, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे, असे मंत्री चव्हाण म्हणाले.

आणखी वाचा-मेट्रोचे गर्डर वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात, मध्यरात्रीपासून घोडबंदर मार्गावर मोठी कोंडी

या बैठकीला आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते अधिक संख्येने उपस्थित होते. आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या बैठकीत सक्रिय होत्या. आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ बैठकीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन गायकवाड हे तुरूंगात असले तरी तेच या भागाचे उमेदवार आणि आमदार असतील असे सूचित केले. कल्याण पूर्वेत भाजपचे चांगले काम आहे. पक्षाची उत्तम बांधणी आहे. त्यामुळे येथे भाजपचा उमेदवार असेल. डोंबिवलीत अनेक वर्ष मीच निवडून येतो. तसेच गणपत गायकवाड कल्याण पूर्वेत बाजी मारतात. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाला निवडणूक लढविण्याची इच्छा असते. इच्छा असणे त्यात गैर काहीच नाही. महायुतीत अनेक इच्छुक उमेदवार असले तरी शेवटी उमेदवारीचा अंतीम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार आहे, असे मत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Story img Loader