अंबरनाथ: हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भल्या पहाटे उठून परिस्थितीचा आढावा घेत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात दिवसा ढवळ्या कचरा पेटवून त्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ शहरात पालिका मुख्यालयाच्या मागेच हा कचरा पेटवला जातो आहे. त्याचा धूर आसपासच्या परिसरात नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांत मुंबईसह आसपासच्या शहरात हवा दूषित होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत होता. परिणामी प्रदूषण करणाऱ्या संस्था, कामे यांच्यावर विविध निर्बंध टाकण्याचे काम स्थानिक पालिका प्रशासनाने केले. नुकतेच मुंबईतील विविध ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत पाहणी केली. मुंबई आणि ठाण्यात रस्त्यांवरून उडणारी धूळ थोपवण्यासाठी रस्ते धुण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. प्रमुख शहरांमध्ये हवा दूषित होण्यापासून थांबवण्यासाठी उपाय योजले जात असले तरी उपनगरांमध्ये मात्र अशा उपाययोजनांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हेही वाचा – डोंबिवली गरीबाचापाडा, देवीचापाडा, नवापाडा भागात कचऱ्याचे ढीग, मलनिस्सारणाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण

अंबरनाथसारख्या शहरात वर्षानुवर्षे रासायनिक वायू, सांडपाणी आणि कचऱ्याची समस्या आहे. त्याचा वालधुनी नदी किनारच्या, औद्योगिक वसाहतीच्या शेजारच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर अनेक घोषणा झाल्या मात्र ठोस उपाययोजना अद्याप राबवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आजही मोरीवली, आनंद नगर आणि वडोल एमआयडीसी शेजारच्या नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ पालिका मुख्यालयाच्या मागे आणि अंबरनाथ स्थानकाच्या बाजूच्या रुळांशेजारी मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो आहे. लहान कचरा गाड्यांमधून हा कचरा येथे टाकला जातो. तेथून तो उचलून कचारभूमीवर नेणे अपेक्षित आहे. मात्र हा कचरा येथेच पेटवून त्याची विल्हेवाट लावली जाते आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर धूर होतो आहे. त्याचा त्रास आसपासच्या नागरिकांना होतो.

हेही वाचा – कल्याणमधील मल्लखांबपटू पुरूषोत्तम सावंत यांचे निधन

रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांनाही या धुराचा त्रास होतो. यावर लोकसत्तामधून सातत्याने प्रकाश टाकण्यात आला. त्या त्या वेळी त्यावर नियंत्रण मिळवले गेले. मात्र आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून हा कचरा पुन्हा पेटवला जात आहे. त्यामुळे पश्चिम भागासह पूर्व भागातही मोठ्या प्रमाणावर धूर पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.