डोंबिवली – येथील पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील गरीबाचापाडा, देवीचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा भागातील परिघ क्षेत्र चाळी असलेल्या भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात आहे. हा कचरा रात्रीच्या वेळेत स्थानिकांकडून जाळला जातो. त्यामुळे हवा प्रदूषण होत आहे. हा कचरा पालिकेकडून उचलला जात नसल्याने शहराच्या अंतर्गत भागात स्वच्छता दिसत असली तरी शहराच्या परिघ क्षेत्रावर कचऱ्याचे ढीग, तुटलेली गटारे, रस्त्यावर वाहणारे मलनिस्सारणाचे पाणी असे दृश्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवीचापाडा गोपीनाथ चौक ते जगदंबा माता मंदिर भागात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतून ३०० मीटरचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा शहरातील नागरिक राडारोडा, कचरा, टाकाऊ वस्तू आणून टाकत आहेत. ठराविक टेम्पो चालक हा राडारोडा टाकण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी स्वच्छता अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा – ठाणे : डुबी रेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रेती व्यवसायिकांची मागणी

देवीचापाडा, गरीबाचापाडा, नवापाडा, गणेशनगर भागात उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा पाहूनही सकाळच्या वेळेत सफाई कामगार, आरोग्य निरीक्षक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी आहेत. शहराच्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर दिसणारा कचरा फक्त उचलला जातो, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. पालिकेत तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. सफाई कामगार हजेरी निवाऱ्यावर हजेरी लावून झाल्यानंतर गायब होत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

अशीच परिस्थिती कोपर, आयरे भागात आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग, ग प्रभागातील परिघ क्षेत्र भागाचा अचानक पाहणी दौरा करून योग्य सूचना अधिकाऱ्यांना देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीत धुळीचे लोट, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एमआयडीसीकडून कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी

“सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्या वाहन चालकांचा वाहन क्रमांक तपासून त्या चालक, मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.” – वसंत देगलुरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी.