डोंबिवली- डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात भाजी विक्रेते, फेरीवाले दिवसभर व्यवसाय करतात. रात्री उशिरापर्यंत विक्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतर टाकाऊ वस्तू रस्त्यावर टाकून जातात. यामध्ये नाशीवंत भाजीपाला, वस्तू बांधणीचे खोके, कचरा यांचा समावेश आहे. पावसाळ्यात या वस्तू पावसाच्या पाण्याने वाहून जात गटार, नाल्यात अडकतात. उर्वरित वस्तू दररोजच्या उचलून आम्ही हैराण होतो, अशा तक्रारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या सफाई कामगारांनी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पूर्वेतील स्कायवाॅक, पाटकर रस्ता, नेहरु रस्ता, चिमणी गल्ली, फडके रस्त्यावर भाजी विक्रेते, फेरीवाले बसतात. रात्री उशिरापर्यंत या विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू असतो. रात्री अकरा वाजल्यानंतर विक्रेते विक्रीच्या ठिकाणच्या टाकाऊ वस्तू कचराकुंडीत न टाकता व्यवसाय केल्याच्या ठिकाणी टाकून देतात. यामध्ये नाशीवंत भाजीपाला, खोके, दोऱ्या, पिशव्या यांचा समावेश असतो. उन्हाळ्यात हा कचरा कोरडा असतो. त्यामुळे उचलताना काही वाटत नाही. पावसाळ्यात कचरा भिजत असल्याने तो उचलताना त्रास होतो. हलका कचरा पावसाच्या पाण्यात गटार, नाल्यात वाहून जाऊन पाण्याला अडथळा निर्माण करतो, असे कामगारांनी सांगितले.

हेही वाचा >>>उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा भीतीच अधिक वाटते- मनसे आमदार राजू पाटील

फेरीवाल्यांनी तयार केलेले कचऱ्याचे ढीग उचलताना दररोज कामातील अधिक वेळ या अनावश्यक कामासाठी जातो, अशा तक्रारी फेरीवाल्यांनी केल्या. पालिका अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना रस्त्यावर कचरा टाकायचा नाही. तयार कचरा जवळच्या कचराकुंडी किंवा घर परिसरातील कुंडीत टाकण्याच्या सूचना करण्याची मागणी कामगारांकडून केली जाते.पहाटे चार वाजल्यापासून डोंबिवली परिसरातील नोकरदार रेल्वे स्थानकाकडे जातात. त्यांनाही या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करत पुढे जावे लागते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage on road by hawkers in dombivli railway station area amy
Show comments