डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि २७ गावांच्या हद्दीतील नांदिवली पंचानंद, एमआयडीसी, आजदे भागांतील कचरा पालिकेकडून नियमित उचलण्यात येत नसल्याने या भागांत रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक दिवसांपासून कचरा एकच ठिकाणी पडून आहे. त्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जागोजागी दरुगधी पसरली आहे. परिणामी रोगराई पसरण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर विभागातील काही भागांतील कचरा गेल्या वीस दिवसांपासून उचलण्यात येत नाही, अशा तक्रारी येथील रहिवाशांनी केल्या आहेत. या भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे कचरा उचलण्यासाठी पालिकेची वाहने येत नाहीत. कचरा जागीच कुजत असल्याने परिसरात दरुगधी पसरली आहे. सिमेंट रस्त्याच्या संथगती कामामुळे कोणतेही वाहन या भागात येत नाही. त्यातच कचरा उचलण्याचे वाहन न आल्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवक रणजित जोशी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
डोंबिवली पूर्व भागातील नांदिवली पंचानंद परिसरातील कचरा गेल्या चार ते पाच दिवसांपासून उचलण्यात येत नाही. गावे पालिकेत समाविष्ट झाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी कामे करीत नाहीत. पालिकेचे कर्मचारी या भागात फिरकत नसल्याने नांदिवली पंचानंद भागात कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यां सुप्रिया कुलकर्णी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा