किरकोळ बाजारातील दर ३०० रुपये किलोवर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साठेबाजांनी निर्माण केलेल्या कृत्रिम टंचाईमुळे एकीकडे डाळी महाग झाल्या असताना आता रोजच्या वरण-भाजीतील अविभाज्य घटक असलेला लसूणही वरणापेक्षा खिशाला फोडणी देऊ लागला आहे. कोरडय़ा लसणाचा साठा कमी होऊ लागल्याने किरकोळ बाजारात लसणाचे दर ३०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर घाऊक बाजारात तो जवळपास १०० रुपये किलोने विकला जात आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे दिवाळीच्या हंगामात येणाऱ्या लसणाची आवक कमी झाल्याने ही महागाई ओढवल्याची प्रतिक्रिया व्यापारी देत आहेत.

पूर्वी घरांमध्ये लसणाचा साठा करून ठेवण्याची पद्धत असे. मात्र सध्या जागेअभावी आणि विस्कळीत हवामानामुळे असे करणे शक्य होत नाही. जैन समाजवगळता साधारण सर्व घरांमध्ये वरणाला, भाजीला फोडणी देण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. या भाववाढीमुळे घरा-घरांमध्ये फोडणीमधून लसणाचे प्रमाण कमी कमी होत असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे.

कोरडय़ा लसणाचा साठा संपुष्टात येत असल्याने ही भाववाढ झाली, अशी माहिती ठाण्यातील किरकोळ भाजी विक्रते रवी कुर्डेकर यांनी दिली. सर्वसाधारणपणे दिवाळीच्या काळात नवीन लसूण बाजारात येतो. मात्र यंदा हवामानातील बदलांमुळे साठवलेल्या लसणाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नवीन आलेल्या पिकाला पूर्णपणे तयार होण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती लसणाचे घाऊक विक्रेते भिकू जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. थंडीच्या हंगामामध्ये लसणाचे नवे ताजे पीक येते. मात्र ते पूर्णत: कोरडे झाल्याशिवाय विक्रीस ग्राह्य़ धरले जात नाही. ग्राहकही ओला लसूण विकत घेत नाहीत. त्यामुळे लसूण उपलब्ध जरी असला तरी त्याचा वापर करण्यासाठी ग्राहकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. बाजारातील कोरडय़ा लसणाचा साठा कमी झाला आहे आणि काही दिवसांमध्ये संपण्याची भीतीही बाजारामध्ये वर्तवली जात आहे. घाऊकमध्ये उच्चप्रतीचा लसूण ६० रुपये पाव किलो, तर किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये पाव किलो दराने विकला जात आहे. सध्या सामान्य नागरिकांना लसणासाठी किलोमागे २८० ते ३०० रुपये एवढे पैसे मोजावे लागत आहेत.

लसूण चैनीची नव्हे तर जीवनावश्यक गोष्ट आहे. स्वयंपाकातील लसणाचा वापर आरोग्यदायी ठरतो.  दिवसभरात गृहिणी लसणाचा एक कांदा सहज वापरतात. पूर्वी वापरात नसलेले प्लास्टिक देऊन त्याबदल्यात लसूण मिळे. मात्र या भाववाढीमुळे तेही मिळत नाही.  – प्रमिला उत्तेकर, ठाणे</strong>