ठाण्यात आंबेडकर रोड परिसरात एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाचपाखाडीतील आंबेडकर रोड परिसराच्या चाळीमधील एका घरामध्ये हा स्फोट झालाय. यामध्ये पाच जण जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतंय. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी 11 च्या सुमारास संदीप काकडे यांच्या घरात हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संदीप काकडे (40), हिंमांशू काकडे (12), वंदना काकडे (50), लतिका काकडे (35) अशी जखमींची नावं आहेत. जखमींना सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.