कल्याण: कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅल समोर सोमवारी सकाळी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या सीएनजी बस मधून गॅस गळती झाली. मेट्रो माॅल भागातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ओरडा करुन चालकाला बस थांबविण्याचा इशारा केला. चालकाने बस थांबविताच बसच्या सीएनजी टाकीतून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करुन गॅस गळती रोखण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बस थांबताच प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. काही दिवसापूर्वी मेट्रो माॅल समोर नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला रात्रीच्या वेळेत अचानक आग लागली होती. ही घटना ताजी असताना आज या उपक्रमातील एका बसमधून गॅस गळती झाली.नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाची एक बस सोमवारी सकाळी कल्याणकडे शिळफाटा रस्त्याने येत होती. बसच्या सीएनजी टाकीमधून गॅस बाहेर पडत असल्याचे पादचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा : डोंबिवली: लोढा पलावामधील गुंतवणूक संस्थेकडून ३०० गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक

जागरुक नागरिकांनी तात्काळ ओरडा केला. बस चालकाला बस थांबविण्याचा इशारा केला. चालकाने बस थांबविल्यानंतर चालकाला सीएनजी गॅस टाकीतून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत असल्याचे पाहिले. वाहक, चालकाने तात्काळ अग्निशमन जवानांना संपर्क केला. जवान घटनास्थळी येताच त्यांनी टाकीवर पाण्याचा मारा करुन गॅस गळती रोखली. ही घटना निदर्शनास आली नसती तर आगीचा भडका उडून अनर्थ घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गॅस गळती कशी झाली याचा तपास परिवहन उपक्रमाच्या तांत्रिक पथकाने सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas leak from navi mumbai municipal transport service bus metro mall kalyan tmb 01