ठाणे : येथील माजीवडा भागातील वसंत लॉन्स परिसरात बुधवारी दुपारी जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान गॅस वहिनी फुटली. यामुळे परिसरातील पाचशे घरांचा गॅस पुरवठा तीन तासंपासून ठप्प असून फुटलेली वहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.

ठाणे येथील माजीवडा भागातील वसंत लॉन्स परिसरातील सेवा रस्त्यावर महापालिकेमार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सेवा रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असताना त्याखाली असलेली महानगर गॅस कंपनीची १२५ मी.मी व्यासाची वाहीनी फुटली. सुमारे ३ वाजता गॅस वहिनी फुटली. या घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा…पावणे सहा कोटीचे दागिने घेऊन चोरटे परराज्यात?

फुटलेल्या गॅस वाहिनीतून होणार गॅस पुरवठा महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सद्यस्थितीत वसंत लॉन्स या परिसरातील ५०० घरांचा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. अंदाजे पुढील ३ ते ४ तासामध्ये गॅस पुरवठा पूर्ववत होईल असे महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

Story img Loader