लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: महानगर कंपनीच्या गॅस पुरवठा वाहिनीत बिघाड झाल्याने गुरुवार सकाळी ८ वाजल्यापासून कोपरी आणि मुलुंड परिसरातील २० हजार ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. दुपारी ४ वाजता गॅस पुरवठा पूर्वरत होणार असल्याचा अंदाज महानगर गॅस कंपनीने दिला आहे. यामुळे ऐन सणाच्या दिवशीच गॅस पुरवठा ठप्प झाल्याने हजारो ग्राहकांचे हाल झाले.

महानगर गॅस कंपनीकडून ठाणे आणि मुंबई परिसरात घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात येतो. वहिनीद्वारे गॅसचा पुरवठा करण्यात येतो. परंतु या वाहिन्या तुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामुळे घरगुती गॅस पुरवठा काही तासांसाठी ठप्प होत असल्याचे चित्र दिसून येते. अशाचप्रकारे गुरुवारी महानगर कंपनीच्या गॅस पुरवठा वहिनीत बिघाड झाल्याने गुरुवार सकाळी ८ वाजल्यापासून कोपरी आणि मुलुंड परिसराचा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. त्याचा फटका मुलूंड पूर्व, पश्चिम आणि ठाण्यात कोपरी पूर्व भागातील २० हजार ग्राहकांना बसला आहे.

हेही वाचा… छोटय़ा उद्योगांतील कर्मचाऱ्यांसाठीही निवासी संकुले

दुपारी ४ वाजता गॅस पुरवठा पूर्वरत होणार असल्याचा अंदाज महानगर गॅस कंपनीने दिला आहे. ऐन सणासुदीच्या काळात गॅसपुरवठा खंडीत झाल्याने गोडाधोडाचे पदार्थ बनविण्याची तयारीत असलेल्या गृहिणींच्या आनंदावर विरजण पडले असून अनेकांना बाहेरून खाद्यपदार्थ विकत आणावे लागले. दरम्यान ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल महानगर गॅस कंपनीने खेद व्यक्त केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas supply in kopri and mulund area has been stopped due to failure in the gas supply line of mahanagar company dvr