स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील रनर्स क्लॅन फाउंडेशनने सैनिकांना मानवंदना देण्यासाठी २६ जानेवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली धावण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ६५ किलोमीटरची ही दौड २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे सुरू होऊन डोंबिवलीत सकाळी पोहचणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रनर्स क्लॅन फाउंडेशनचे लक्ष्मण गुंडप, ईश्वर पाटील आणि इतर सदस्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, एनसीपीए, हुतात्मा चौक, पी. डिमेलो रोड, शीव, वडाळा, सायन सर्कल, चेंबूर, वाशी बस आगार, कोपरखैरणे, महापे, शिळफाटा येथून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातून फडके रस्त्यावरील गणपती मंदिरहून कॅ. विजयकुमार सच्चान स्मारक येथे सलामी देवून ग्लोब युनायटेड, उस्मा पेट्रोल पंपच्या पुढे डोबिवली (पूर्व) येथे सकाळी साडेआठ वाजता दौड समाप्त होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी धावपटूंना सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा – मुंबईत रामदास आठवले की प्रकाश आंबेडकर कोणाची अधिक ताकद ?

या संस्थेच्या माध्यमातून डोबिवली, कल्याण परिसरात भारतीय लष्कर, नाविक दल, वायुदल, निमलष्करी दल, पोलीस अशा संरक्षण क्षेत्रात भरती होऊ इच्छिणाऱ्या होतकरू तरुण, तरुणींसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमातून जमा होणारा निधी या केंद्रासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे, असे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : नागपाड्यात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

समाजामध्ये स्वतःच्या आरोग्याप्रती जागृती निर्माण व्हावी आणि निरोगी व तंदुरुस्त समाज निर्माण व्हावा, नवीन पिढीला शारीरिक कष्टाची व्यायामाची सवय लागावी, त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी रनर्स क्लॅन फाउंडेशनचे योगदान आहे. या दौडमध्ये सुमारे १०० हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. प्रथमच जागतिक पातळीवरील मॅरेथॉन गाजवणारे कॉम्रेड धावपटू यात सहभागी होणार आहेत. आयर्नमेन मानांकीत धावपटू, अल्ट्रा रनर्स, मॅरेथॉन रनर्स, उदयोन्मुख धावपटू, तसेच डोंबिवली, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा अशा ठिकाणचे धावपटू, त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, निवृत्त अधिकारी अशी समाजातील विविध स्तरांतील लोक सहभागी होत आहेत. दौडचा परितोषिक वाटपाचा समारंभ बालरोग तज्ज्ञ डॉ. अजित ओक, उच्चपदस्थ नरसिंहन सी के, गुडरिच मेरीटाइम प्रा. लि. आणि मॅरेथॉनर्स, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता सुधीर नागे, ग्लोब डेव्हलपर्सचे माधव सिंग यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.