ठाणे: ठाणेकरांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात चौपाटी उभारण्यात आली आहे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेल्या या चौपाटीची अवघ्या तीन वर्षातच दुरावस्था झाल्याची बाब मनसेने उघडकीस आणली आहे. येथील स्वच्छतागृहाची दुरावस्था तर, वीजेअभावी चौपाटीवर सर्वत्र अंधार असल्याचे चित्र असून याठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडण्याची भिती व्यक्त करत ही चौपाटी महिला आणि मुलींसाठी सुरक्षित नसल्याचा दावा मनसेने केला आहे. यामुळे चौपाटीच्या देखभाल व दुरुस्तीकडे कानाडोळा करणाऱ्या पालिकेच्या कारभारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हेही वाचा >>> कल्याण जवळील मोहने येथे १४९ वीज चोरांवर कारवाई; ४१ लाखाची वीज चोरी उघड

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना नवे पर्यटन केंद्र, मनोरंजन आणि विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध व्हावे या उद्देशातून प्रशासनाकडून विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून घोडबंदरच्या गायमुख खाडी किनारी भागात चौपाटी उभारण्यात आली आहे. महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ही चौपाटी उभारण्यात आली आहे. ठाण्यातील या पहिल्या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ मध्ये करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तसेच त्याच्या जोड कामांसाठी सुमारे ४० कोटींचा निधी खर्च केला आहे. ठाण्यातील नागरिकांना मनोरंजन व विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ही चौपाटी विकसित करण्यात आली. या चौपाटीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. पंरतु या चौपाटीची अवघ्या तीन वर्षातच दुरावस्था झाल्याची बाब मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे.

हेही वाचा >>> बदलापूरः वांगणी ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच; शिवसेनेच्या शिंदे गटात फुट, महाविकास आघाडी निष्प्रभ

या चौपाटीवरी विद्युत खांब उभारण्यात आलेले असले तरी ते विजेअभावी बंद आहेत. त्यामुळे चौपटीवर सर्वत्र अंधार असतो. लहान मुलेही खाडीत पडण्याची दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौपाटी तर अंधारात आहेच शिवाय सुरक्षितेच्या दृष्टीने येथे एकही सुरक्षा रक्षक दिसून येत नाही. या चौपाटीवर स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात आली आहे. परंतु वीज आणि पाण्याची व्यवस्था तिथे नाही. शिवाय प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. जे नळ बसविण्यात आले होते, ते ही गायब झालेले दिसून येतात. तर रात्री मद्यपी लोकांचा सर्रास वावर असून जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. ठाणेकरांसाठी एकमेव लाभलेल्या चौपाटीवर अनेकजण विरंगुळ्यासाठी येत आहेत. पण अवघ्या तीन वर्षातच त्याची दुरावस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात मुले पळविण्याचा प्रकार असो किंवा शाळकरी मुलीवर केलेला विनयभंग असो अशा प्रकारामुळे मुलींच्या तसेच लहान मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत असताना अशा चौपाटीवर सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे, असे महिंद्रकर यांनी म्हटले आहे. या चौपाटीच्या दुरावस्थेस महारष्ट्र मरीटाईम बोर्ड तसेच ठाणे महापालिका प्रशासन असे दोघे जबाबदार आहेत. यानिमित्ताने ठाण्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांविषयी पालिकेचे प्रशासन किती जागृत आहे याची कल्पना नव्या आयुक्तांना येईल, असे त्यांनी म्हटले आहे.