ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नल परिसरात अवजड वाहन भर रस्त्यात बंद पडल्याने आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी मानपाडा, कोलशेत, ब्रम्हांड, ढोकाळी मार्गावरून वाहतूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना एक ते सव्वातास लागत आहे. सकाळी ७.३० वाजेपासून सुरु झालेली कोंडी सकाळी ११ नंतरही सुरळीत झाली नव्हती. शाळेच्या बसगाड्या या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थीदेखील शाळेत वेळेत पोहोचू शकले नाहीत.

घोडबंदर येथून आनंदनगर सिग्नल परिसरातून अतिअवजड वाहन वाहतूक करत होते. शुक्रवारी ७.३० वाजताच्या सुमारास हे वाहन अचानक बंद पडले. या वाहनात मोठ्याप्रमाणात लोखंडी वस्तू होत्या. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांसाठी मार्गिका अत्यंत अरुंद झाली आहे. तसेच ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच वाहन बंद पडल्याने दोन्ही मार्गिकांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती. आनंदनगर ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
Traffic jam on both lanes due to track closure on highway
महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
person has died in an accident on Shiv Panvel road
नवी मुंबई: विचित्र अपघात एक ठार
Jammu Kashmir Truck Accident
Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू

हेही वाचा – नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, भिवंडीत धक्कादायक प्रकार

हेही वाचा – ठाणे: पर्यटन अर्थार्जनावर पाणी, जिल्ह्यातील प्रमुख निसर्गस्थळांवर जाण्यास पर्यटकांना यावर्षीही मज्जाव

घोडबंदर भागात अनेक खासगी आणि सरकारी शाळा आणि महाविद्यालय आहेत. वाहतुक कोंडीमुळे शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. तसेच घोडबंदरमधून ठाण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा फटका बसला. दोन ते अडीच तास शाळेच्या बसगाड्या कोंडीत अडकून होत्या. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचू शकले नाही. नोकरदारांनाही वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. काही वाहनचालकांनी मनोरमानगर, कोलशेत, ब्रम्हांड, ढोकाळीमार्गे वाहतूक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या पर्यायी मार्गांवरही कोंडीचे चित्र होते. वाहतूक पोलिसांकडून या अवजड वाहनाला रस्त्यामधून बाजूला काढण्याचे कार्य सुरु होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हे वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले. परंतु वाहनांचा भार वाढल्याने कोंडी कायम होती.

Story img Loader