तुमच्या घरी पैशाचा पाऊस पाडतो. तुमची गरिबी दूर करतो, अशा बतावण्या करीत अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विजय ठुमरे (४२) या भोंदुबाबाला त्याची साथीदारीण जानकी हिंदाळे (३४) हिच्यासह बालगुन्हेगारी प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी अटक केली. आतापर्यंत या भोंदुबाबाने २३ मुलींवर अत्याचार केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हा बाबा एलआयसी एजंट आहे. अनेक कुटुंबांतील मुलींना मी तुमच्या घरची गरिबी दूर करतो. तुमच्या घरात पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगत आपल्या जाळ्यात ओढायचा. काही प्रकरणांत पालकांचीही या भोंदुबाबाला साथ असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना या भोंदुबाबाची माहिती मिळाली होती. डोंबिवलीतील वसंत विहार या उच्चभ्रू वस्तीत त्याचे वास्तव्य होते.  

Story img Loader