रविवारी कार्यालयीन सुट्टी असतानाही २२ वर्षीय सहकारी तरुणीला कार्यालयात बोलावून मालकाने तिच्या बलात्कार केल्याची घटना खोपट येथे घडली.
किर्तीकुमार शहा (६१) असे या मालकाचे नाव असून तो मुलुंड भागात राहतो. रविवारची कार्यालयीन सुट्टी असतानाही शहा याने पीडित तरुणीला कामावर बोलाविले होते आणि कार्यालयात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर बलात्कार केला.
या तरुणीने त्यास विरोध केला असता, त्याने तिचे डोके भिंतीवर आपटले, तसेच या घटनेविषयी कुणाला सांगितले तर कामावर काढून टाकेन, अशी धमकही त्याने दिली. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader