कल्याण – भिवंडी येथील काल्हेर ते कल्याण पूर्व असा रिक्षाने प्रवास करीत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र मोटार सायकलवरील दोन चोरट्यांनी खेचून पोबारा केला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान पत्रीपूल येथे हा प्रकार घडला.
अनिता मिलिंंद गायकवाड असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या रविवारी सायंकाळी भिवंडी जवळील काल्हेर गावातून रिक्षाने कल्याण पूर्वेतील तिसगाव येथे आनंद गायकवाड यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी येत होत्या. त्यांच्यासोबत पती होते.

पत्रीपूल येथे रिक्षा आल्यावर पाठीमागून मोटार सायकलवरून दोन जण आले. त्यांनी दुचाकी रिक्षाजवळ आणली. रिक्षात बसलेल्या अनिता यांच्या गळ्यावर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने जोराने फटका मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मंगळसूत्र खेचल्याचे लक्षात येताच अनिता आणि त्यांचे पतीने चोर म्हणून ओरडा केला. पंरुतु ऐवज घेऊन चोरटे नेतिवलीच्या दिशेने पळून गेले. अनिता यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Story img Loader