लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: ईराणी टोळीतील सोनसाखळी चोर सलमान ईराणी (२३) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणले असून त्याच्याकडून ७० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

गेल्याकाही दिवसांपासून ठाण्यात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ठाणे पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी गस्त घातली जात असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, कापूरबावडी भागात सोनसाखळी चोरणारा सलमान ईराणी हा कल्याण येथील आंबिवलीमध्ये राहत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती.

आणखी वाचा- कल्याण पूर्वेतील वसार, माणेरे गावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला आंबिवली येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याच्या इतर साथिदारांसोबत कापूरबावडी, चितळसर मानपाडा, नौपाडा, कळवा या भागात आठ ठिकाणी सोनसाखळी चोरल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून कापूरबावडी येथील चार, कळवा येथे दोन, नौपाडा आणि चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold chain thief in iranian gang arrested mrj
Show comments