पर्यावरण दक्षता मंच तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपले पर्यावरण हा लघुचित्रपट महोत्सव ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरणात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी तरुणांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने हा लघुचित्रपट महोत्सव सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
पर्यावरणाच्या समस्या, उपाययोजनांविषयीची माहिती, पर्यावरण शिक्षण या विषयांवर आधारित महोत्सवात लघु चित्रपट दाखवण्यात येत आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गोमाता बचाव या लघुपट दाखविण्यात आला. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे जनावरांना असलेला धोका यात दाखविण्यात आला आहे. तसेच घरगुती खत प्रकल्पातून कचऱ्याच्या समस्येवर मात करता येऊ शकते, असा संदेशही या लघुपटातून दिला जातो. ‘सूर्यकुंभ’ या लघुपटाच्या माध्यमातून सौरउर्जेचा वापर करून सूर्याच्या किरणांच्या आधारावर अन्न शिजवता येऊ शकते याविषयी सविस्तर माहिती प्रेक्षकांना मिळाली. पाण्याचा योग्य वापर, कचरा व्यवस्थापन, आणि जैवविविधता या विषयांवर रिअलाईज, सेव्ह वॉटर, पॅराबल, अंकुर थिम पार्क व्हिजिट, आय ड्रिम ऑफ माय क्लिन क्रिक, वेकअप, वाटचाल नव्या दिवाळीची, रिस्पेक्ट द फ्लॅग तिरंगा, माझी सखी कापडी पिशवी, मेरी मर्जी, कचरा खाणारी मॅजिक बकेट, ऑर्गेनिक फार्मिग, चैन पडेना आम्हाला, असे पर्यावरणविषयक चित्रपट यावेळी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
ठाणे विभागातील नौपाडा, लोकमान्यनगर, वर्तकनगर, कळवा, खारीगाव, घोडबंदर तसेच मुंबई येथून गोवंडी, नाहूर येथून एकूण ४५ शाळा आणि ११ महाविद्यालयातील ६००० विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. सकाळी ९ ते ११ आणि १२ ते २ या वेळेत गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा