कल्याण- कल्याण पूर्वेतील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकावर तलवार, मोठ्या सुऱ्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार हल्लेखोरांनी व्यावसायिकाला ‘तू कोणत्याही पोलीस चौकीत जा, आमच्यावर काही होणार नाही,’ असे खुले आव्हान दिले. यामुळे हल्लेखोरांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काल रात्री हा प्रकार घडला.

हेही वाचा >>> ठाणे महापालिका अवकाळी पावसामुळे चिंतेत; रस्ते कामांवर परिणाम होण्याची भिती

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Hardeep Singh Nijjar aide Arsh Dala Arrested
भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला कॅनडात अटक; खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा निकटवर्तीय अर्श डल्ला कोण आहे?
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Stone pelted on Prof Laxman Hake vehicle in Nanded news
नांदेडमध्ये प्रा. लक्ष्मण हाकेंचे वाहन फोडले
hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!

राज्याचे गृहमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे त्यांचे आदेश आहेत की नाहीत, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कल्याण मध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत तलवारी, सुऱ्यांनी हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या वादाचे कारण पुढे करुन हे हल्ले केले जात आहेत. नसीम शेख (३१) हे व्यावसायिक कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात राहतात. काल रात्री ते घराजवळील रिक्षेत भोजन झाल्यावर बसले होते. त्यावेळी तेथे आरोपी इरफान पिरजादे, बाबा पठारे, सागर पावस्कर, राकेश गायकवाड हातात दांडके, तलवारी, सुरे घेऊन आले. त्यांनी नसीम यांच्या तलवारी, सुऱ्याने हल्ला चढविला. नसीम यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुरू असताना नसीम मोठ्या कौशल्याने त्यांच्या तावडीतून निसटले. ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी इरफान पिरजादे याने नसीमला ‘तु कोणत्याही पोलीस चौकीत जा, आमचे कुठेही काहीही होणार नाही.’ असे बोलून शिवीगाळ केली. नसीमच्या पत्नीलाही मारण्याची धमकी इरफान यांनी दिली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.