डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील गटाराचा प्रवाह १०० हून अधिक बेकायदा चोरीच्या नळजोडण्यांसाठी भूमाफियांनी बंद केला आहे. गटारातून येणारे पाणी नाल्यात जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी माघारी येऊन परिसरातील रस्त्यावर मागील दोन दिवसांपासून पसरले आहे. नागरिकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभाग, ह प्रभाग कार्यालयात तक्रारी केल्या आहेत, पण त्याची कोणीही दखल घेत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गोपीनाथ चौक ते लक्ष्मी नारायण कृपा, माऊली चाळी, जगदांबा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवार दुपारपासून दोन फूट पाणी साचले आहे. गटारातून माघारी येणारे पाणी आणि त्यात मुसळधार पावसाचे पाणी वाहून येत असल्याने या रस्त्यावरुन येजा करताना नागरिकांची त्रेधातिरपिट उडत आहे. शाळकरी मुले, महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. शाळकरी मुलांना कडेवर घेऊन रस्ता पार करावा लागतो. गोपीनाथ चौकातील पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरुन भूमाफियांनी जगदांबा माता मंदिर परिसरातील दोन ते तीन हजार बेकायदा चाळींना पाणीपुरवठा करण्याची सोय केली आहे. या जलवाहिन्या गोपीनाथ चौकातील गटारांवरुन, मधून सिमेंट काँक्रीट टाकून बंदिस्त केल्या आहेत. सत्यवान चौक, उमेशनगर भागातून वाहून येणारे सांडपाणी, आता पावसाचे पाणी गोपीनाथ चौकातील गटारातून भरत भोईर नाल्यात जाते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे गटारामधील नळजोडण्यांना कचरा अडकून ते पाणी माघारी येत आहे. हे पाणी आजुबाजूचा रस्ता आणि चाळींमध्ये घुसले आहे.
हेही वाचा – घोडबंदर मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी
मंगळवारपासून या रस्त्यावर दोन फूट गटाराचे सांडपाणी वाहत आहे. या रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकी, रिक्षा, मोटारींचे इंजिन पाण्यात बुडत असल्याने ही वाहने तुंबलेल्या पाण्यात बंद पडत आहेत. पालिकेचे सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी सकाळी या भागातून येऊन गेले, त्यांनीही गटारातील तुंबलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. रात्रीच्या वेळेत सरपटणारे पानथळ साप सदृश्य प्राणी या पाण्यात तरंगत होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या रस्त्याच्या एका बाजूला कलावती आई मंदिर, जगदांबा माता मंदिर आहे. या मंदिरात दररोज सकाळ, संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक, वृद्ध भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची या दोन फूट पाण्यातून येजा करताना कुचंबणा होत आहे.
पालिकेच्या आपत्कालीन विभागात या भागातील अनेक रहिवाशांनी संपर्क केला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे रहिवाशांनी सांगितले. पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने या भागातील सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ म्हात्रे यांनी आपण खासगी कामगार घेऊन हे पाणी जाण्यासाठी मार्ग करुन देतो असे आश्वासन रहिवाशांना दिले. शहरात तुंबलेले पाणी, गटार, नाल्याचे पाणी घरात आले तर त्या परिस्थितीमधून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन कक्षातील कामगार सहकार्य करतात. मंगळवारपासून ह प्रभागातील कामगार, आपत्कालीन कक्षातील कामगार गोपीनाथ चौकातील तुंबलेले पाणी काढण्यासाठी येत नसतील तर आयुक्तांनी आपत्कालीन कक्ष बंद करावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
“गोपीनाथ चौकात पाणी तुंबले असेल तर तेथे तात्काळ कामगार पाठवून पाणी मोकळे करण्यासाठी आदेश देतो.” – सुहास गुप्ते, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.