महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था विविध स्तरावर काम करत आहेत. संस्था चालवणं म्हणजे सोपं काम नाही. त्यातच या संस्थांपुढे अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न कायम अग्रस्थानी राहिला आहे. हा विचार लक्षात घेता ठाण्यातील उज्वला बागवाडे यांनी धान्य बँकची संकल्पना पुढे आणली. आपल्या काही मैत्रिणींना त्यांनी प्रत्येकीने किमान एक किलो अन्नदान करण्याचं आवाहन केलं. हे जमा केलेलं अन्नधान्य गरजू संस्थांपर्यंत पोहोचवलं जातं. आर्थिक रुपात मदत करण्यापेक्षा एखाद्याच्या पोटाची भूक भागवून आपण या कार्यात योगदान देऊ शकतो. या उद्देशाने उज्वला यांनी त्यांच्या मैत्रिणींच्या साथीने ‘वी टुगेदर फांऊडेशन’ची स्थापना केली. वी टुगेदर फांऊडेशनने आतापर्यंत राज्यातील १५ संस्थांचं पालकत्व घेतलं असून वर्षातील नऊ महिने त्यांना शिधा पुरवला जातो. गृहिणी आणि समाजकार्याचा मेळ साधणाऱ्या या धान्य बॅंकेची गोष्ट नक्की पाहा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi thane we together foundation ujwala bagwade ssa