राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेले विधान हे केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करणारे आहे. राज्यपालांना मराठी माणसाची किमंत कळलेली नाही. मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा कदापी सहन केला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. राज्यपालांना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या इतिहासबाबत माहिती नसल्याने त्यांची मराठी माणसावर व्यक्त होण्याची लायकी नाही. त्यामुळे राज्यपालांना माघारी पाठवण्याची नाही तर सरळ हकलवुन लावण्याची वेळ आली आसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात ‘ मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.’असे वक्तव्य केले आहे. त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांवर कडाडून टीका केली आहे. मुंबई ही महाराष्ट्राला सहजासहजी मिळाली नाही. त्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. गुजराती आणि राजस्थानी समाजाविषयी आम्हाला आदर आहे. परंतु, महाराष्ट्रातील मराठी कष्टकऱ्यांनी इथे व्यवसायासाठी उत्तम वातावरण निर्माण केल्याने विविध समाजातील नागरिक येथे आले. मराठी माणसाने मुंबईला मोठे केले. देशाला एक व्यवसायिक रूप हे मुंबईने दिले आहे. देशातील सर्व व्यावसायिक हे केवळ महाराष्ट्रात मोठे झाले आहेत. हा सर्व इतिहास राज्यपालांना माहिती नसल्याने त्यांची मराठी विषयी बोलायची लायकी नाही. त्यामुळे राज्यपालांनी आपल्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली. राज्यपालांना आता इथून हकलून देण्याची वेळ आली असून त्यासाठी वेळ पडल्यास राजभवनात घुसण्याची देखील तयारी असल्याचे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. ‘राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्याचे आव्हाड यांनी यावेळी समर्थन केले. राज्यपालांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सोमवारी जोडे मारो आंदोलन करणार असून राज्यपालांना जोडे भेट देणार असल्याची माहितीही आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आव्हाडांनी भाषा सांभाळावी – आशिष शेलार</strong>
राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च पद आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विधानावर व्यक्त होताना भाषा आणि मर्यादा सांभाळावी, असे मत भाजपा नेते आशीष शेलार यांनी व्यक्त केले आहे. गृहनिर्माण मंत्री असताना आव्हाड यांनी कोणत्याही मराठी विकासकाला काम दिले नाही. त्यांच्या दालना बाहेर अमराठी विकासकांच्या रांगा लागलेल्या असायच्या. त्यामुळे आव्हाडांनी मराठी माणसाच्या हिताविषयी बोलू नये. तसेच राजभवनात घुसण्याची भाषा करणाऱ्या आव्हाडांच्या प्रकरणामध्ये आम्ही घुसल्यास त्यांना तोंड दाखवता येणार नाही, असेही शेलार म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor has insulted marathi identity jitendra awad amy