ठाणे : भिवंडी येथील सुरई सारंग ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयास सोमवारी मध्यरात्री आग लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याघटनेत कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि काही साहित्य जळून खाक झाले. ही आग कोणी लावली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरई सांरग येथे ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. सोमवारी मध्यरात्री  या कार्यालयाची खिडकी उघडून अज्ञातांनी कार्यालयात ज्वलनशील पदार्थ फेकले. त्यामुळे कार्यालयातील तीन खुर्च्या, एक टेबल, दोन तैलचित्रे जळून खाक झाली. याप्रकरणी ग्रामसेवकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.