ठाणे : ठाण्यातील रोटरी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. दुपारी २ वाजता ही स्पर्धा सुरू करण्यात आली. विश्वनाथन आनंद हे एकाचवेळी २२ बुद्धीबळ पटुंसोबत खेळत आहेत. ही स्पर्धा बघायला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यक्रमात ५०० जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही स्पर्धा टिपटॉप प्लाझा येथे होत असून सुमारे ५०० हून अधिक बुद्धीबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तर विश्वनाथन आनंद यांच्या विरुद्ध २२ बुद्धीबळपटुंचा सामना कोरम मॉल सुरू आहे. सुमारे अडीच लाख रुपयांची बक्षिसे आणि ८० मानचिन्हे देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand master vishwanathan anand today in thane css