लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे: ठाण्यातील रोटरी क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धीबळ स्पर्धेस ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकाच वेळी २० बुद्धिबळ पट्टूना त्यांच्याशी स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे.

रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अ‍ॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यक्रमात ५०० जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. तर विश्वनाथन आनंद यांच्या विरुद्ध २० बुद्धी पट्टू हा सामना १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कोरम मॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा… ठाण्यातील टेकडी बंगला, हाजुरी भागातही क्लस्टर योजनेची अंमलबजावणी; ‘या’ शासकीय संस्थेबरोबर पालिकेने केला करार

सुमारे अडीच लाख रुपयांची बक्षिसे आणि ८० मानचिन्हे देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना गौरविण्यात येणार असल्याचे माहिती रोटरी क्लब ठाणे मिडटाऊनच्या वतीने सांगण्यात आली आहे.