डोंबिवली : येथील एमआयडीसीत गुरुवारी दुपारी एक गुलमोहराचे झाड धावत्या रिक्षेवर कोसळले. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्ते कामे, सततच्या खोदाईमुळे एमआयडीसीतील जुनाट झाडांची मुळे सैल झाली आहेत. काँक्रीट रस्त्यांमुळे या झाडांचा मातीचा आधार निघून गेला आहे. त्यामुळे अशा धोकादायक झाडांचा एमआयडीसी प्रशासनाने विचार करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रामदिन लोधी (६०) असे मरण पावलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ते शिळफाटा रस्त्यावरील कोळे गावात राहत होते. गुरुवारी दुपारी ते एमआयडीसी भागातून रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेचे एक गुलमोहराचे जुनाट झाड अचानक रामदिन लोधी यांच्या रिक्षेवर उन्मळून पडले. या झाडाच्या बुंधा आणि फांद्यांखाली रिक्षा चेपली गेली. चेपलेल्या रिक्षेत चालक लोधी अडकून पडले. ते बचावासाठी ओरडा करत होते.

Vitthalwadi police raided illegal hookah parlor registering case against driver and customers
उल्हासनगरमधील माणेरे गावातील हुक्का पार्लर चालकावर गुन्हा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”
Sambhaji Raje Chhatrapati on Chhaava Trailer Dance
Chhaava Trailer: ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखविल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे संतापले
case registered against Dr Ramdas Bhoir in Ulhasnagar for running clinic without permission
वैद्यकीय पदवी जवळ नसताना रुग्णसेवा देणाऱ्या उल्हासनगरमधील डाॅक्टरवर गुन्हा
Torres
Maharashtra News LIVE Updates: टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, बँक खाती गोठवली
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

also read

उल्हासनगरमधील माणेरे गावातील हुक्का पार्लर चालकावर गुन्हा

परिसरातील रहिवासी, पादचाऱ्यांनी धाव घेऊन चेपलेल्या रिक्षेत अडकलेल्या लोधी यांना रिक्षेतून बाहेर काढले. ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. लोधी हे ज्येष्ठ नागरिक होते. डोंबिवली रेल्वे स्थानक ते एमआयडीसी, कोळेगाव, काटई परिसरात ते प्रवासी सेवा देत होते. या घटनेने रिक्षा चालकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या झाडाखाली दुचाकी, इतर रिक्षा उभ्या होत्या. त्यांचेही नुकसान झाले आहे.

also read

वैद्यकीय पदवी जवळ नसताना रुग्णसेवा देणाऱ्या उल्हासनगरमधील डाॅक्टरवर गुन्हा

एमआयडीसीतील झाडे काही समाजकंटक जाळून टाकण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काही झाडे सुूकून चालली आहेत. काही झाडांवर रासायनिक प्रयोग करून त्यांना मारून टाकले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा समाजकंटकांचा नागरिक शोध घेत आहेत. एमआयडीसीत मागील तीन ते चार वर्षात काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली. या खोदाईत अनेक जुनाट झाडांची मुळे तुटली आहेत. मातीचा आधार गेल्याने काही झाडे मरणासन्न अवस्थेत आहेत. ही झाडे आता कोसळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Story img Loader