मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गुरुपौर्णिमे निमित्त दुपारी साडेबारा वाजता आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर शक्तिस्थळ येथे जाऊन नतमस्तक होणार आहेत. तर, दुपारनंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे देखील शक्तीस्थळावर जाणार आहेत. त्यामुळे आज शिवसैनिक आणि शिंदे गटाचे या ठिकाणी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंभीनाका येथे येणार असल्याने सुमारे ११:३० वाजेच्या सुमारास आनंद आश्रम ते जांभळीनाका येथील वाहतूक वळविली जाणार आहे. ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने कोर्टनाका, बाजारपेठेतून स्थानकाच्या दिशेने वाहतूक करतील. तर ठाणे स्थानक परिसरातून कोर्टनाकाच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने चिंतामणी चौक येथून डॉ. मालतीबाई चिटणीस रुग्णालय येथून वाहतूक करतील, असे कळवण्यात आले आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी…”, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Eknath Shinde
Eknath Shinde On RSS : “संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात…”; आरएसएस मुख्यालयात पोहचताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray shivsena
Deepak Kesarkar : “…तर शिवसेनेचे दोन भाग झालेच नसते”, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Narendra Bhondekar, Narendra Bhondekar Bhandara ,
फडणवीसांचाच प्रस्ताव स्वीकारायला हवा होता… शपथविधीनंतर शिंदेंच्या आमदाराकडून उघड…
Eknath Shindes struggle while selecting Shiv Sena ministers in cabinet
Eknath Shinde : शिंदे यांची तारेवरची कसरत

दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे सुद्धा ठाण्यातील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी येणार आहेत. यावेळी ते शिवसेनेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे टेंभीनाका आणि आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी शिवसैनिक आणि शिंदे गट असे दोघांचे शक्तीप्रदर्शन पहावयास मिळणार आहे.

शिवसैनिक आंनद दिघे यांना गुरुस्थानी मानतात –

शिवसेनेतुन बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून समर्थन मिळत आहे. मात्र, काही जुने पदाधिकारी आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले असून त्याचबरोबर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे सुद्धा पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. शिवसैनिक आंनद दिघे यांना गुरुस्थानी मानत असल्याने आनंद आश्रम येथे दरवर्षी मोठी गर्दी होते. यंदा मात्र शिवसेनेचे दोन गटाचे येथे शक्तिप्रदर्शन दिसून येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता टेंभीनाका येथे येणार आहेत. तर, केदार दिघे हे सुद्धा चार वाजता ठाण्यातील दिघे यांच्या समाधीस्थळी येणार आहेत. तसेच गुरुपौर्णिमे निमित्त नवनियुक्त महिला आघाडी पदाधिकारी देखील शक्तिस्थळावर अभिवादन करायला येणार आहे.

Story img Loader