डोंबिवली- डोंबिवली जवळील कोळे-वाकळण रस्त्यावरील वडवली गाव हद्दीत एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या ट्रकमधून मानपाडा पोलिसांनी १४ लाख ५८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात ट्रक चालकाला अटक केली आहे. त्याच्या सहकाऱ्याचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> जलस्त्रोत काठोकाठ; बारवी, आंध्रा धरण भरले, जिल्ह्याची पाणीचिंता मिटली

कल्याण-डोंबिवली शहर, ग्रामीण भागात शासन प्रतिबंधित गुटख्याची मोठी उलाढाल अन्न आणि प्रशासन विभागाचे अधिकारी, पोलिसांना अंधारात ठेऊन सुरू आहे. डोंबिवली, कल्याणमध्ये स्थानिक पोलिसांनी अनेक पान टपरी चालकांकडून गुटखा जप्त केला आहे. अशा कारवाया सुरू असतानाच मानपाडा पोलिसांनी वडवली गाव हद्दीतून १४ लाख ५९ हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. अब्दुल सज्जाक अब्दुल रज्जाक चौधरी (३४, रा. एम. के. चाळ, दिवा) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या ट्रकचा मालक मुन्ना उर्फ सफिक शेख (रा. सावरकर नगर, ठाणे) हा फरार झाला आहे. वडवली गाव हद्दीत एक ट्रक गुटख्याचा साठा घेऊन आडबाजुला उभा करण्यात आला आहे. अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून ट्रक चालकाला अटक केली.

हेही वाचा >>> ठाणे : जिल्ह्यात तीन आठवड्यात १६ करोना मृत्यू; रुग्णसंख्या घटली मृत्यू वाढले

पोलिसांनी ट्रकसह त्यामधील लाखो रुपयांचा गुटखा असा एकूण ३७ लाख ८१ हजार रूपये किंमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी हवालदार विजय कोळी यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा आणि मानदे अधिनियम २००६ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या ट्रकवाल्याने इतका मोठा गुटख्याचा साठा कोठून आणला ? कुणाकडून आणला ? कुणाला वितरीत करण्यात येणार होता ? याचा तपास वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे करत आहेत. गेल्या पाच दिवसापूर्वी टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे आणि त्यांच्या पथकाने कल्याणच्या पत्रीपूल ते डोंबिवली जवळच्या खंबाळपाडा पट्ट्यात पानटपऱ्यांसह गुटख्याचे बेकायदा साठे करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gutkha worth 15 lakh police seized in vadvali village near dombivli ysh