लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : विविध मागण्यांसाठी गेले अनेक दिवस पत्र देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अखिल भारतीय दिव्यांग सेनेने ठाणे महापालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन केले. पालिका प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर अपंगांनी हे आंदोलन मागे घेतले. चार दिवसात प्रश्न मार्गी लागले नाहीतर आयुक्तांच्या दालनासमोर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांनी दिला आहे.

thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
BJP MLA Parag Shah is Maharashtra's Wealthiest Candidate from Ghatkopar East Constituency
‘५०० कोटींवरून पाच वर्षात थेट ३३०० कोटी’, सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीचा तपशील वाचून डोळे गरगरतील
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

ठाणे शहरातील अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय दिव्यांग सेनेकडून पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना अद्याप स्टाल, टपरी, गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. ठाणे महापालिकेकडून नवीन दिव्यांग स्टाल मंजूर झालेले नसल्याने जे दिव्यांग स्टाल लावत आहेत. त्यांच्यावरील कारवाई रहित करावी. ज्या दिव्यांगांच्या स्टालवर कारवाई केली आहे. त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत. लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टॉल देण्यात यावेत. २०२३-२४ आणि २०२४-२५ चे दिव्यांगांचे अनुदान ठाणे महापालिका यांनी लवकरात लवकर वाटप करावे. दिव्यांग ज्या ठिकाणी राहतात, त्यांच्या घराचे फोटोपास काढून नोंदणी करावी. दिव्यांगांना टॅक्स व पाणी बिल मध्ये ५० टक्के सुट द्यावी.

ठाणे महापालिका ५ टक्के स्विकृत नगरसेवक, तसेच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी आणि शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. ठाणे महापालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनयिम २०१६ नूसार कलम ९२ अन्वये कारवाई करुन त्याजागी सक्षम अधिकारी यांची नेमणुक करावी. राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे ठामपा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी, दिव्यांगव्यक्ती व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली असता सदर जागा व्यवसायभिमुख नसल्याने व्यवसाय होत असलेली जागा बदली करून द्यावी अशाही सेनेच्या मागण्या आहेत.

या मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी सेनेने ठाणे महापालिका समोर मुंडन करून आंदोलन केले होते. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासननंतर सेनेने आंदोलन स्थगित केले होते. परंतु त्याची आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे प्रजासत्ताक दिनी पालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी हे अर्ध नग्न आंदोलन केले. समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी आंदोलकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. तसेच, दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Story img Loader