ठाणे : मुंब्रा येथे फेरीवाल्यांमध्ये झालेल्या वादातून सात ते आठ जणांनी फेरीवाल्याला बेदम मारहाण करून त्याच्या पायावरून दुचाकी चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे फेरीवाल्याचा पायाला दुखापत झाली आहे. तर त्याच्या भावाला देखील मारहाण झाली असून घटनेप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मुंब्रा बाजार परिसरातील रस्त्यालगत जखमी फेरीवाला कापड विक्रीचा व्यवसाय करतो. याच परिसरात आणखी काही फेरीवाले घरगुती वस्तू आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री करतात. रविवारी फेरीवाला त्याठिकाणी गेला असता, त्या जागेवर दुसऱ्या एका फेरीवाल्याने कापड विक्रीचा व्यवसाय करण्यास सुरूवात केली होती. फेरीवाल्याने याबाबत आक्षेप घेतला असता, परिसरातील इतर चार ते पाच फेरीवाले त्याला धक्काबुक्की करू लागले. त्यानंतर फेरीवाल्याचा भाऊ त्याठिकाणी त्याचा बचावासाठी आला.
हेही वाचा…लोक अदालतीची नोटीस येताच चालकांनी भरली ६६ लाखांचा थकित दंड
स
वाद मिटल्यानंतर फेरीवाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याचा व्यवसाय करू लागला. काहीवेळाने त्या फेरीवाल्यांनी त्याला पुन्हा बोलाविले. तो फेरीवाला तेथे गेला असता, त्याला इतर फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली. फेरीवाल्याचा भाऊ पुन्हा त्याठिकाणी आला असता, त्यालाही मारहाण झाली. ही घटना घडत असताना नागरिक बघ्याची भूमिका घेत होते. यातील एकाने फेरीवाल्याच्या भावाला हाॅकीच्या काठीने डोक्यात मारले. यात त्यांना रक्तस्त्राव झाला. त्यांचे मित्र त्याठिकाणी आल्यानंतर त्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली. त्यानंतर त्यांनी जखमी फेरीवाल्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग करून त्याला पकडून हाॅकीच्या काठीने मारहाण केली. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने तो रस्त्यालगत बसला. त्याचवेळी फेरीवाल्याने त्यांच्या पायावरून दुचाकी नेली. यात त्याच्या पायाचा गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.