करवसुलीमुळे कडोंमपाच्या कर्मचाऱ्यांची गस्त थंडावली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई.रवींद्रन यांच्या आदेशानंतरही कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कॉयवॉकवर पुन्हा एकदा बेकायदा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने सध्या महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांमधील कर्मचारी कर वसुलीच्या कामास लागले आहेत. त्यामुळे वाढत्या फेरीवाल्यांकडे प्रभाग कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे, असे सांगितले जाते.

दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांची रेल्वे स्थानक परिसरातील गस्त कमी झाली आहे हे लक्षात येताच स्कायवॉकवर सुमारे ७० ते ८० फेरीवाले गेल्या काही दिवसांपासून सकाळपासून ठाण मांडून बसले आहेत. ई.रवींद्रन यांच्या दौऱ्यापूर्वी कल्याण आणि डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई केली जाते. त्यानंतर काही दिवसांत चित्र जैसे थे होत असल्याने आयुक्तांचे आदेशही अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारने स्थानिक संस्था कराची वसुली बंद केल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला होता. त्यामुळे आयुक्तांनी गेल्या काही काळापासून कर वसुलीवर भर दिला आहे. मालमत्ता तसेच पाणी बिल थकविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील कर्मचाऱ्यांना जुंपले जात आहे. अतिक्रमण विरोधी पथकातील काही कर्मचारीही या कारवाईसाठी नेमले जात आहेत. कधी नव्हे ते शिक्षण मंडळातील विस्तार अधिकाऱ्यांना कर वसुलीच्या कामात जुंपण्यात आले आहे. त्यामुळे ही कारवाई थंडावल्याचा सूर व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांच्या व्यस्ततेचा फायदा  घेत गेल्या काही दिवसांपासून वचक बसलेले फेरीवाले स्कॉयवॉक तसेच आसपासच्या परिसरात पुन्हा अवतरले आहेत. यामुळे पुन्हा प्रवाशांना त्रास होत असून त्यांवा गर्दीतून वाट काढावी लागत आहे.

गोदामातील साठाही विक्रीला

कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही स्थनके बेकायदा फेरीवाल्यांसाठी मोक्याची ठिकाणे मानली जातात. अर्थसंकल्पाचे सादरीकरण करताना खुद्द आयुक्तांनी स्थानक परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळा केला जाईल, अशी घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात उतरावी यासाठी रवींद्रन स्वत सातत्याने रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. असे असताना गेल्या काही दिवसांपासून मात्र चित्र पूर्वीसारखे दिसू लागले असून आपल्यावर कारवाई होत नाही याची पुरेपूर जाणीव असल्याने गोदामातील साठाही ते स्कायवॉकवर आणून ठेवत आहेत.