लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली – येथील पूर्व भागातील उर्सेकरवाडी भागात मंगळवारी संध्याकाळी फेरिवाल्यांनी ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ केली. एकावेळी ५० हून अधिक फेरीवाले आक्रमकपणे फेरीवाला हटाव कामगारांवर धावून आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ड़ोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कामगारांना दररोज धमक्या, शिवीगाळ करण्याचे प्रकार फेरीवाल्यांकडून सुरू आहेत. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, अंधेरी, मस्जिद भागातील आहेत. काही फेरीवाले गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याच्या तक्रारी आहेत. असे असतानाच, ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक मंगळवारी संध्याकाळी उर्सेकरवाडी भागात फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करत होते. फेरीवाल्यांच्या आडोशाला लपून ठेवलेले सामान जप्त केले जात होते. यावेळी राहुल गुप्ता या फेरीवाल्याचे सामान जप्त करताच त्याने आक्रमक भूमिका घेऊन पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे आणि त्यांच्या कामगारांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पथकावर गैरव्यवहार करण्याचे आरोप करत त्याने विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. गुप्ता याला पाठिंबा देण्यासाठी ५० हून अधिक फेरीवाले पालिका पथकावर हल्ला करण्याच्या तयारीत होते.

आणखी वाचा-ठाणे : प्रेमसंबंधास नकार दिल्याने महिलेला जिवंत जाळले

पोलीस ठाण्यात तक्रार

ग प्रभागातील कामगार सुनील सुर्वे हे शनिवारी पथक प्रमुख साळुंखे यांच्या बरोबर फेरीवाले हटविणे आणि सामान जप्तीची कारवाई करत होते. यावेळी उर्सेकरवाडीतील फेरीवाले बाबू चौरासिया, दिलीप गुप्ता,अनिल गुप्ता यांनी सामान जप्त करण्यास विरोध केला आणि एकटा सापडला की मारण्याची धमकी दिली. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत गृहसंकुलातील प्ले झोनमध्ये खेळताना बालकाचा मृत्यू

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील रस्ते, चौक फेरीवाले, टपऱ्यांनी गजबजून गेले आहेत. रस्तोरस्ती वाहन दुरुस्तीची गॅरेज सुरू करण्यात आली आहेत. पदपथ अडवून व्यवसाय केला जात आहे. ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथक रेल्वे स्थानक भागात कोणत्याही प्रकारचे काम नसताना गुप्ते रोडवरील चहाच्या ठेल्यावर तळ ठोकून असतात. साहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी या पथकाच्या माध्यमातून प्रभागातील रस्ते, पदपथ अडवून बसलेल्या व्यावसियाकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ह प्रभागात आक्रमक कारवाई होत नसल्याने आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगेड यांनी सूचना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.