डोंबिवली : भाजीपाला घेऊन घरी पायी चाललेेल्या एका वृध्दाला दोन भुरट्यांनी रस्त्यात गाठले. वृध्दाला ओम नम शिवाय मंत्र बोलण्यास सांगून त्यांना भुरट्यांनी संमोहित केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातामधील अंगठ्या असा ५३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज काढून घेऊन भुरटे पसार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील ॲपेक्स रुग्णालया समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. दत्ताराम भिकाजी पार्टे (७०, रा. साजन हाईट्स, गरीबाचापाडा, डोंबिवली) अशी फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील बाजारातून भाजीपाला खरेदी करुन तक्रारदार दत्ताराम पार्टे पायी आपल्या गरीबाचापाडा येथील घरी चालले होते.

हेही वाचा >>> काटई-बदलापूर रस्त्यावरील पेव्हर ब्लाॅक, डांबराच्या पट्ट्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा खोळंबा

घनश्याम गुप्ते रस्त्याने जात असताना ॲपेक्स रुग्णालयाच्या समोर दोन अनोळखी इसमांनी दत्ताराम यांना थांबिवले. सोमवार असल्याने त्यांना ओम नम शिवाय असा भोलेनाथाचा गजर करण्यास सांगितले. या कालावधीत भुरट्यांनी दत्ताराम यांना संमोहित केले. संमोहित झाल्यावर भुरट्यांनी दत्ताराम यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातामधील अंगठी असा ऐवज काढून घेतला. दत्ताराम यांना बोलण्यात गुंतवणूक दोन्ही भुरटे घटनास्थळावरुन पळून गेले.

हेही वाचा >>> कडोंमपाचे क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत यांचा पदभार काढला, क्रीडा विभागात अनियमतता केल्याचा ठपका

आपली फसवणूक दोन जणांनी केल्याचे लक्षात आल्यावर दत्ताराम यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. असाच प्रकार दोन महिन्यापूर्वी डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानक परिसरात झाला होता. बहुतांशी भुरटे चोर शहराच्या परिघ क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळींमध्ये राहतात. त्यामुळे चोरी केल्यानंतर पळून जाणे आणि लपणे सहज सोपे होते, असे एका पोलिसाने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: He robbed an old man in dombivli by asking him to say om nam shivaya ysh
Show comments