कल्याण : सार्वजनिक स्वच्छतेसाठी कल्याण-डोंबिवली पालिकेचे प्रशासन कमालीचे आग्रही आहे. पालिका आयुक्त स्वत: डॉक्टर आहेत. तरीही पालिकेचे डोंबिवली विभागातील शास्त्रीनगर रुग्णालय घाणीचे आगर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या रुग्णालयाच्या गच्चीवर वैद्याकीय कचऱ्याचे ढीग पसरले आहेत. रुग्णालयाच्या जिन्यात अस्वच्छतेचे साम्राज्य असून रुग्णांना त्याचा संसर्ग होण्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शास्त्रीनगर रुग्णालयात दररोज सुमारे ६०० हून अधिक रुग्ण, उपचारांसाठी येतात. या रुग्णालयाचा दर्शनी भाग स्वच्छ केला जातो. मात्र, अंतर्गत जिने, रुग्णालय खोल्यांसमोरील मोकळे भाग स्वच्छ करण्यात आलेले नाहीत. शास्त्रीनगर रुग्णालय इमारतीच्या गच्चीवर अनेक महिने सफाई न केल्याने करोना काळातील गाद्या, वैद्याकीय साहित्यावर धुळीचे थर, जळमटे साचली आहेत. या घाणीमुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबविल्याने पालक चिंतेत, शासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप

आयुक्त डॉ. इदुराणी जाखड स्वत: वैद्याकीय सेवेतील डॉक्टर आहेत. त्यामुळे रुग्णालयात किती, कशाप्रकारे स्वच्छता पाहिजे हे त्या जाणून आहेत. अशा परिस्थितीत शास्त्रीनगर रुग्णालयातील अस्वच्छतेकडे आयुक्तांसह कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने रुग्ण, नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी पाणी नाही, महापालिकेच्या पाणी योजनेतील दुरुस्ती कामांमुळे पाणीपुरवठा बंद

शास्त्रीनगर रुग्णालयात सर्व बाजूने नियमित स्वच्छता केली जाते. पाऊस सुरू झाल्याने रुग्ण, नातेवाईकांच्या पायाची धूळ जीने, मोकळ्या जागेत पडत आहे. गच्चीवरील टाकाऊ वैद्यकीय साहित्य उचलण्यासाठी प्रभागाला कळविले आहे. तेथेही स्वच्छता केली जाईल. – डॉ. सुहासिनी बढेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी शास्त्रीनगर रुग्णालय

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heaps of medical waste at shastrinagar hospital neglect of administration due to dirt patients fear infection ssb
Show comments