ठाणे : घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात उड्डाणपूल निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे येथील मार्गिका अरुंद झाली असून अतिअवजड मालवाहू वाहने (ओडीसी) रस्त्यामध्ये अडकून कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी नाशिक, उरण येथील जेएनपीटी बंदर आणि मुंबई, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अतिअवजड मालवाहू वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घातली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे वाहतुक बदल लागू करण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अतिअवजड वाहनांच्या वाहतुकीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदर, भिवंडी, नाशिक येथून हजारो अतिअवजड आणि अवजड मालवाहू वाहने घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करत असतात. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अवजड तसेच अति अवजड वाहनांना वाहतूक करण्यास दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत परवानगी आहे. यावेळेत अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. शिवाय, घोडबंदर भागाचे गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण झाले असून त्याचबरोबर येथे वाहन संख्येतही मोठी वाढ झाली आहे. येथील नागरिक घोडबंदर मार्गेच वाहतूक करतात. यामुळे या मार्गावर अवजड तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच या मार्गावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी एमएमआरडीने मुख्य मार्गावरील दुभाजकालगत आणि सेवा रस्त्यांलगत लोखंडी मार्गरोधक उभारले आहेत. त्यामुळे येथील मार्गिका अरुंद झाली असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत आहे. दररोज ठाणेकरांना घोडबंदरच्या कोंडीत अडकावे लागत आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून कोणीही कुठलीही ऑफर दिलेली नाही- संजीव नाईक यांनी दिले स्पष्टीकरण

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मुख्य मार्गावरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएकडून कासारवडवली भागात उड्डाणपुल निर्माणाचे काम सुरू आहे. या कामांमुळे येथील मार्गिका आणखी अरुंद झाली आहे. या मार्गावरून अतिअवजड वाहनांनी प्रवेश केल्यास मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी अतिअवजड वाहनांना घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करण्यास प्रवेश बंदी लागू केली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हे वाहतुक बदल लागू असतील अशी माहिती ठाणे वाहतुक पोलिसांनी दिली.

अतिअवजड वाहनांसाठी वाहतुक बदल

– मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने माजिवडा येथून खारेगाव टोलनाका, मानकोली मार्गे वाहतुक करतील. किंवा खारेगाव टोलनाका, मानकोली, कशेळी येथून वाहतुक करतील.

– मुंब्रा बाह्यवळण येथून खारेगाव टोलनाका मार्गे घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. येथील वाहने खारेगाव टोलनाका येथून मानकोली, अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.

– नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना मानकोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून अंजुरफाटा मार्गे वाहतुक करतील.

अतिअवजड वाहनांना ओडीसी म्हणजेच, ओव्हर डायमेन्शनल कार्गो म्हटले जाते. ही वाहने कंटेनरपेक्षा दुप्पट मोठी आणि लांबीला २० ते ४० फूटांपर्यंत असू शकतात. या वाहनांतून प्रामुख्याने मोठ्या प्रकल्पांसाठी लागणारे लोखंडी गर्डर, लोखंडी पट्ट्या, अतिशय अवजड वस्तूंची वाहतुक होत असते. घोडबंदर भागात रात्रीच्या वेळेत या वाहनांची वाहतुक अधिक होते.