कल्याण : डोंबिवली, कल्याण परिसरात शनिवारी दुपारी विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस पडला. ऐन नवरात्रोत्सवात पडलेल्या जोरधारांमुळे भाविकांची गैरसोय झाली. उत्सवी वातावरणामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील बाजारपेठा दररोज गर्दीने गजबजतात. शनिवारी सकाळी आकाश निरभ्र होते. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकही मोठय़ा संख्येने दर्शनासाठी बाहेर पडले होते. मात्र अचानक मुसळधार पाऊस पडू लागल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे गावदेवी, कुलदैवत मंदिरांजवळ उभारलेले मंडप अपुरे पडले.

Story img Loader