लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: शुक्रवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना पर्यायी रस्त्यांचा अवलंब करून इच्छित स्थळी जावे लागले. मुसळधार पावसामुळे सकाळच्या वेळेत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. विक्रेते इमारती, निवारे यांचा आडोसा घेऊन उभे होते.

डोंबिवली पश्चिमेत गरीबाचा वाडा, महात्मा फुले रोड, प्रकाश म्हात्रे चौकात पाणी तुंबले होते. पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात पाणी तुंबल्याने प्रवाशांना पाण्यातून रेल्वे स्थानकात जावे लागले.

हेही वाचा… मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कल्याणमध्ये शिवाजी चौक, मुरबाड रोड, संतोषी माता रोड, मोहने, आंबिवली, टिटवाळा, कोळसेवाडी, चिंचपाडा, तिसगाव, मलंग रोड परिसरात पाणी तुंबले होते.