ठाणे जिल्ह्याला शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपले. जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे शहरातील मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग, कशेळी काल्हेर मार्ग आणि कळवा भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे पोलिसांनीही रस्ते मार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भंडार्लीचा कचरा प्रकल्प साडी, गाद्या, फर्निचरमुळे सात दिवसांपासून बंद;  ठाण्याचा कचरा पुन्हा दिवा कचराभुमीवर

जिल्ह्यात सकाळपासून ठाणे, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी शहरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या भागात आता पावसाचे पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे साकेत ते घोडबंदर येथील ब्रम्हांड, भिवंडीतील मानकोली, पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पूल ते माजीवडा, कशेळी काल्हेर आणि कळवा परिसरात विविध ठिकाणी कोंडी झाली आहे. यात अनेक शाळेच्या बसगाड्या आणि रुग्णवाहिका अडकून आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in thane district amy