बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच जलाशयातील पाणीसाठा वाढला असून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत पाणी साठा ६० टक्क्यांवर पोहोचला. गेल्या २४ तासात बारावी धरणक्षेत्रात १५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात २०६.६७ घन मीटर पाणीसाठा होता. त्यामुळे समधान व्यक्त होते आहे.

हे ही वाचा… उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली, संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

हेही वाचा… VIDEO : ठाण्यातील महिलेने केलं पाकिस्तानात जाऊन लग्न; भारतात परतल्यावर म्हणाली, “फेसबुकवर…”

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षात बारवी धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र सुदैवाने पाणी कपात करण्याची वेळ आली नाही. जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला असला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नव्हता. त्यामुळे बारवी धरण संथगतीने भरत होते. मात्र गेल्या आठवड्यापासून बारवी धरणक्षेत्र, मुरबाड तालुका आणि आसपासच्या भागात संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारी दिवसभर बारवी पणालोट क्षेत्रात १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात २०६.६७ घन मीटर पाणीसाठा झाला. तर धरणाने ६७.४० मीटर इतकी उंची गाठली. त्यामुळे गुरुवारी धरण ६०.९९ टक्के इतके भरले आहे. बुधवारी धरणात ५४ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे एका दिवसात तब्बल सहा टक्के पाणी धरणात वाढले आहे. तर गेल्या आठवडाभरात बारवी धरणाचा पाणीसाठा ४४ तक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरण संथगतीने भरते आहे. गेल्या वर्षी २५ जुलै रोजी धरणात ७६ टक्के पाणी साठा होता. गुरुवारीही संततधार पावसाचा अंदाज खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बारवी धरणात समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे.