लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : विधानसभा मतदानाचा प्रचार थंडावला असून आता मतदानाची प्रतिक्षा सुरू झाली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि इतर साहित्यांचे वाटप अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना केले जाणार आहे. तसेच बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून गुरुवारी मतपेट्या आणि इतर साहित्य जमा करावे लागणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे शहरात कोंडी होऊन त्याचा परिणाम मतदान किंवा इतर प्रक्रियेवर पडू नये म्हणून ठाणे वाहतुक पोलिसांनी मंगळवार आज,पासून पुढील तीन दिवस म्हणजेच, गुरुवारपर्यंत शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

गुजरात येथून हजारो अवजड वाहने उरण येथील जेएनपीटी बंदर आणि भिवंडीत दररोज घोडबंदर मार्गे प्रवेश करत असतात. या अवजड वाहनांना ठाणे शहरात दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत प्रवेश असतो. अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. विधानसभा निवडणूकीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. त्यामुळे आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे कोंडी होऊन त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर पडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत मद्य, गांजा सेवन करून रस्त्यावर गैरशिस्तीने वागणाऱ्या तीन जणांवर गुन्हे

  • गुजरात येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे आणि मुंबई, वसई -विरार येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना फाऊंटन रोड येथे प्रवेश बंदी असेल. ही सर्व वाहने कामन रोड, अंजुरफाटा, मानकोली मार्गे वाहतुक करतील.
  • मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ज्युपिटर रुग्णालय येथील उड्डाणपूलावरून कापूरबावडीच्या दिशेने प्रवेशबंदी असेल. येथील वाहने माजिवडा, खारेगाव टोलनाका मार्गे वाहतुक करतील.
  • भिवंडी, कशेळी मार्गे बाळकूम नाका येथून कापूरबावडी चौक मार्गे घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कापूरबावडी चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी चौकातून माजिवडा, मार्गे मुंबई नाशिक महामार्गाने वाहतुक करतील.
  • शिळफाटा, मुंब्रा येथून पारसिक चौक, गॅमन जंक्शनआणि माजिवडा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गॅमन जंक्शन येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने खारेगाव पूल, मानकोली मार्गे वाहतुक मार्गे वाहतुक करतील. हे सर्व वाहतुक बदल मंगळवारी पहाटे ५ वाजेपासून ते गुरुवारी मतदान साहित्य जमा होई पर्यंत लागू राहतील.

Story img Loader