डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांबरोबर पूर्व, पश्चिम भाग जोडणारे ठाकुर्ली, कोपर उड्डाण पुलांवर वाहन कोंडी झाल्याने रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या, पर्यटनाहून घरी परतणाऱ्या प्रवाशांना वाहन कोंडीचा सर्वाधिक फटका बसला. दोन तासाहून अधिक काळ डोंबिवलीतील प्रवासी रविवारी कोंडीत अडकले होते.

डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील मुख्य, अंतर्गत रस्ते या कोंडीत अडकले होते. वाहन कोंडीने सर्व रस्ते गजबजून गेल्यावर मग डोंबिवली विभागाचे वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. तोपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्ता, महात्मा फुले रस्ता, दिनदयाळ रस्ता, कोपर पूल रस्ता कोंडीने गजबजून गेले होते. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाहन चालकांनी पर्यायी अंतर्गत रस्ते शोधले. तेही नंतर कोंडीने गजबजून गेले.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

कोपर पुलावर कोंडी झाल्याने वाहन चालकांनी ठाकुर्ली उड्डाण पुलाचा पर्याय निवडला. एकाचवेळी शहराच्या विविध भागातील वाहने ठाकुर्ली पुलावर एकावेळी आल्याने ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात अडकला. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाकडून येणारी आणि जाणारी वाहने जोशी शाळेसमोरील रस्त्यावर समोरासमोर अडकल्याने कोंडीत आणखी भर पडली. या कोंडीचा फडके रस्ता, नेहरू रस्त्यावरून येणाऱ्या, पश्चिमेतून येणाऱ्या वाहन चालकांना सर्वाधिक फटका बसला.

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाची उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाची शिंदेवर टीका

नववर्ष स्वागत यात्रेसाठी फडके रस्ता विद्युत रोषणाईने गणेश मंदिर संस्थानकडून सुशोभित करण्यात आला आहे. ही रोषणाई बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यांची वाहने फडके रस्त्यावर दुतर्फा लावण्यात आली होती. फडके रस्त्यावर एक मार्गिकेचे नियम तोडून वाहन चालक उलट दिशेने प्रवास करत होते. त्यामुळे फडके रस्ता, टिळक रस्ता, मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरू रस्ता कोंडीच्या विळख्यात अडकले होते.

रात्री उशिरापर्यंत ही कोंडी होती. वाहतूक पोलीस शहरांतर्गत रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करण्याऐवजी वाहने पकडण्यासाठी शहराच्या इतर ठिकाणी थव्याने जाऊन उभे राहतात. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक कोलमडून पडलते. अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या. वाहतूक विभागाचे उपायुक्तांनी एकदा अचानक संध्याकाळच्या वेळेत डोंबिवली, कल्याण भागात दौरा करून या भागातील वाहतुकीच्या नियोजनाबाबत स्थानिक वाहतूक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

Story img Loader