ठाणे, डोंबिवली : संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे, अवजड वाहनांची घुसखोरी आणि पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने गुरुवारी शिळफाटा, मुंबई-नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे -बेलापूर रोड, मुंब्रा बाह्यवळण मार्ग या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मुंबई -नाशिक महामार्ग आणि तळोजा ते शिळफाटा या मार्गावर सात ते आठ किमी तर डोंबिवलीकडून देसाई नाक्यापासून शिळफाटय़ापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने चालक त्रस्त झाले.

या मार्गावरील कोंडीचा ताण संध्याकाळी शहरांतर्गत वाहतुकीवर आला. या वाहतूक कोंडीमध्ये अनेक अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, खासगी कंपनीच्या बसगाडय़ा अडकून होत्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. रात्री ८ नंतरही अनेक शहरांत कोंडी कायम होती. ठाणे जिल्ह्यातून मुंबई-नाशिक महामार्गासह विविध शहरांना जोडणारे मार्ग आहेत. पावसामुळे गेल्याकाही दिवसांपासून मुख्य मार्ग तसेच महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा परिणाम वाहन चालकांना बसू लागला आहे.

Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

कल्याण शिळफाटा मार्गावर टोलनाक्यालगत निळजे पुलावरून वाहतूक करणारी वाहने एकाच वेळी खड्डय़ांच्या भागात येतात. त्यामुळे वाहनांची गती संथ होत असल्याने पुलावरून येणारी वाहने कोंडीत अडकून पडतात, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. गुरुवारी दुपार पासून मानपाडा, काटई नाका, देसाई चौक ते शिळफाटा दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे बदलापूर कडून येणारी वाहने काटई नाका ते बदलापूर रस्त्यावर खोळंबली होती. मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत नसल्याने वाहतूक पोलिसांनी ही वाहने रोखून धरली होती. काटई नाका ते शिळफाटा या दहा मिनिटाच्या रस्त्यासाठी एक ते दीड तास लागत होता, असे प्रवाशांनी सांगितले. ठाणे, कळवा, तुर्भे भागातून शिळफाटय़ाकडे येणारी वाहने शिळफाटा चौक येण्यापूर्वीच वाहन कोंडीत अडकली होती. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे महापे नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.

मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल, खारेगाव टोलनाका या भागांतही मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते माजीवडा आणि भिवंडीहून मुंबई, घोडबंदर आणि ठाणे शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते रांजनोली नाक्याच्याही पुढे असलेल्या घोळवळपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तर जुना आग्रा मार्गावर खड्डय़ांमुळे कैलासनगर ते अवचितपाडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. तर पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी पुलाच्या पायथ्याशी पडलेल्या खड्डय़ांमुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी पूल ते तीन हात नाका पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारे प्रवासी कोंडीत अडकून होते. ठाणे बेलापूर मार्गावरही कळवा पूल ते विटावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रात्री ८ नंतरही शहरात वाहतूक कोंडी कायम होती.

नव्या खड्डय़ांचा परिणाम..

काही ठिकाणी प्राधिकरणांकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु गुरुवारी सुरू असलेल्या संततधारांमुळे पुन्हा त्याच ठिकाणी नवे खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम ठाणे-कळवा- मुंब्रा, तुर्भे, कळवा-विटावा पूल या मार्गावरील वाहतुकीवर झाला.

अंतर दहा मिनिटे.. खोळंबा दीड तास..

कल्याण-शिळफाटा मार्गावर काटई नाका येथील टोलनाका परिसरातील डांबरी रस्त्यावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. काटई नाका ते शिळफाटा या दहा मिनिटांच्या अंतरासाठी एक ते दीड तास लागत होता. तळोजा ते शिळफाटा मार्गावर संध्याकाळी ५ ते ७ पर्यंत वाहनांची रांग एकाच जागी थांबली होती.