ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत, खारेगाव टोलनाका भागात पडलेल्या खड्डय़ांमुळे सोमवारी रात्री साकेत पूल ते मुंबईतील मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईहून ठाणे, घोडबदंर, कल्याण, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. अनेक अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाडय़ा, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाडय़ा, कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत्या. अवघ्या १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना एक ते दीड तास लागत होता. रात्री ८ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूल आणि खारेगाव टोलनाका भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शनिवारी आणि रविवारी राज्य रस्ते विकास महामंडळाने या भागात खड्डय़ांवर खडी टाकून खड्डे बुजविले होते. परंतु सोमवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे खडी वाहून गेली. त्यामुळे पुन्हा या मार्गावर खड्डे पडले. त्यामुळे दुपारपासूनच शहरात वाहतूक कोंडीस सुरुवात झाली होती. सकाळी मुंबईत कामानिमित्ताने गेलेले नोकरदार घरी परतण्यासाठी मुलुंड टोलनाका, कोपरी पूलमार्गे ठाणे, घोडबंदर, भिवंडी, कल्याण आणि नाशिकच्या दिशेने  वाहतूक करत असतात. परंतु वाहनांचा भार वाढून या मार्गावर साकेत पूल ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, खासगी कंपन्यांच्या बसगाडय़ा, बेस्ट आणि टीएमटीच्या बसगाडय़ा, शेकडो कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीत अडकून होत्या. कासवगतीने या वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक

ते दीड तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे महिला नोकरदारांचे सर्वाधिक हाल झाले. रात्री ८ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती.