देवी विसर्जन मिरवणूकांमुळे बुधवारी दुपारपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. दुपारी २ ते रात्री देवी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ही बंदी कायम असणार आहे.
हेही वाचा- दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार – देवेंद्र फडणवीस
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोडतात. हजारो अवजड वाहने उरण जेएनपीटी येथून ठाणे, भिवंडी येथून गुजरात, नाशिकच्या दिशेने वाहतूक करत असतात. या अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहतूक करण्यास परवानगी आहे. उद्या देवीच्या विसर्जन मिरवणूका असल्याने कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही कोंडी टाळण्यासाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी अवजड वाहनांना दुपारी २ ते रात्री देवीच्या मिरवणूका संपेपर्यंत बंदी घातली आहे.